आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकदा आजारपणात डॉक्टर आपल्याला भाताची पेज(rice page) पिण्याचा सल्ला देत असतात. कारण आजारपणात पौष्टीक आणि हलका आहार घेणं गरजेचं असतं. म्हणून डॉक्टरांकडून असा सल्ला दिला जातो. परंतु भाताची पेज(rice page) ही फक्त आजारी असताना प्यावी असं अजिबात नाहीये.
भाताची पेज एक पौष्टीक आहार असल्यानं इतर वेळीही आपण त्याचं सेवन करू शकतो. लहानांपासून वृद्धांपर्यंत सारेच याचं सेवन करू शकतात. आज आपण याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
भाताच्या पेजचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) भाताची पेज पिल्यामुळं अशक्तापणा दूर होतो.
2) भूक वाढण्यासाठी याची खूप मदत होते.
3) थकवा दूर करते.
4) शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
5) पचायला हलकी असल्यानं सहज अन्नपचन होतं. यामुळं पोटाचा त्रास होत नाही.
6) ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता असेल त्यांनी या पेजमध्ये गूळ घालून जर याचं सेवन केलं तर रक्ताीच कमतरता दूर होते.
7) बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
8) ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी यात थोडं साजूक तूप घालून त्याचं सेवन केलं तर वजन वाढण्यास मदत होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.