आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Reverse Walking | डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट नेहमी सांगतात की, सकाळ-संध्याकाळ चालण्याने शरीराला खूप फायदा होतो, पण तुम्ही उलट चालण्याचा विचार केला आहे का? बरेच लोक गंमत म्हणून रिव्हर्स वॉकिंग (Reverse Walking) करत असतात, परंतु अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराला फायदाही करू शकता.
रिव्हर्स वॉकिंगचे जबरदस्त फायदे
तज्ज्ञांच्या मते रिव्हर्स वॉकिंग (Reverse Walking) किंवा बॅक स्टेप चालणे (Back Step Walking) आपल्या हृदय, मेंदू आणि मेटाबॉलिजमसाठी अतिशय लाभदायक आहे, यामुळे सामान्य चालण्याच्या तुलनेत खूप वेगाने कॅलरीज कमी होतात.
10 पट जास्त फायदेशीर उलट चालणे
प्रसिद्ध लेखिका आणि आरोग्य तज्ज्ञ लोरी शेमेक (Lori Shemek) यांच्या मते, 100 पावले उलटे चालणे (Reverse Walking) सामान्य चालण्याच्या 1000 पावलांच्या बरोबरीचे असते. तज्ज्ञांनुसार, उलट चालल्याने मानवी हृदय जलद पंप करते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा अधिक जलद होतो.
रिव्हर्स वॉकिंगचे 5 फायदे
1. स्नायूंसाठी फायदेशीर (Beneficial For Muscles)
उलट चालण्यामुळे काफ मसल, क्वाड्रिसेप्स (Quadriceps), ग्लूट्स (Glutus) वर चांगला परिणाम होतो आणि मेंदूला वेगळ्या पद्धतीने कार्य करण्यास मदत होते.
2. स्ट्रोकच्या रुग्णांनी आवश्य करावे ट्राय
युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी गार्डनर न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट (University of Cincinnati Gardner Neuroscience Institute) च्या एका संशोधकाचे म्हणणे आहे रिव्हर्स वॉकिंगची प्रॅक्टिस स्ट्रोकच्या रुग्णांना (Stroke Patient) पुन्हा चालायला शिकवू शकते.
3. रेट्रो वॉकिंग (Retro Walking) हृदयासाठी चांगले
उलट चालण्याने शरीराच्या अवयवांचे संतुलन सुधारते आणि खालच्या अवयवांचे प्रोप्रिओसेप्शन (Proprioception) आणि चालणे समन्वय येतो. रेट्रो चालणे (Retro Walking) हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि गुडघ्यांच्या सांधेदुखी (Arthritis) च्या लक्षणांपासून मुक्ती मिळू शकते.
4. मेटाबॉलिजम होते बूस्ट
मुंबई (Mumbai) च्या सिम्बायोसिस हॉस्पिटलच्या कॅथ लॅबचे संचालक डॉ. अंकुर फातर्पेकर (Dr. Ankur Phatarpekar) यांनी म्हटले की, उलट चालल्याने हृदय वेगाने धडधडते. हे मेटाबॉलिजम बूस्ट (Metabolism Boost) होते आणि कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न होतात. शरीराचा समतोल राखण्यासाठीही हा एक उत्तम व्यायाम (Exercise) आहे.
5. दृष्टी राहते चांगली (Good For Eyes)
वोक्हार्ट हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट कन्सल्टंट डॉ. सौरभ गोयल (Dr. Saurabh Goel) यांच्या मते, उलट चालणे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दृष्टीही चांगली राहते. (Vision Stays Good)
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Reverse Walking | reverse walking benefits try it today for better health of heart muscle metabolism eyes
Urad Dal | ‘या’ डाळीचा करा दैनंदिन डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या हृदयरोगापासून वाचण्याची सोपी पद्धत