आरोग्यनामा ऑनलाईन टीम – युरिक अॅसिड युरिनद्वारे बाहेर टाकलं जातं. मात्र जर युरिक अॅसिड शरीरात साठून राहू लागलं तर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. युरिक अॅसिड खड्यांच्या रूपात शरीरात साठू लागतं. शरीरामध्ये युरीक अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्याने हाताच्या व पायांच्या बोटांच्या सांध्यांमध्ये वेदना, टाचा आणि गुडघे दुखणे, सुजणे, सांधे लाल होणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. युरीक अॅसिडचे प्रमाण जास्तच वाढल्यास किडनी स्टोन किंवा किडनीचे अन्य काही विकार, मधुमेह यांसारखे रोग होण्याची शक्यता वाढते.
युरिक अॅसिडची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे –
दिवसभरात भरपूर पाणी प्या.
फायबरचं उच्च प्रमाण असलेले हातसडीचे तांदूळ, डाळी यांसारखे पदार्थ खा. यामुळे शरीरातील अतिरिक्त युरिक अॅसिड शोषलं जातं.
हिरव्या पालेभाज्या, फ्लॉवर, पोषक आहार घेऊन युरिक अॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येईल.
सकाळी रिकाम्यापोटी दोन -तीन आक्रोड खावेत.
दररोज नारळपाणी प्या.
युरिक अॅसिडमुळे शरीरात गाठी होतात. गाठी विरघण्यासाठी पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा घालून प्या. यामुळे गाठी विरघळतात.