‘हे’ घरगुती उपाय करून चेहर्‍यावरील डाग ‘गायब’ करा

pimples

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्वच्छ आणि सुंदर चेहरा असावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात. याच्यावर बाजारात क्रीमही मिळतात. पण याचा इफेक्ट फार काळ राहत नाही. त्यामुळे तुम्ही घरगुती पद्धतीने जर हे डाग घालवण्याचा प्रयत्न केला. तर डाग लवकर जातील आणि चेहरा स्वच्छ होईल. जाणून घ्या हे घरगुती उपाय.

१) लिंबाचा रस :

लिंबू किंवा बटाट्याचा रस काढून चण्याच्या पिठात ( बेसन) टाकून मिक्स करावे. हे मिश्रण १५-२० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि मग चेहरा धुवा. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरीत डाग व चट्टे दूर होतात.आणि तुमची त्वचा सुंदर दिसते.

२) बटाटा :

चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी बटाटा हे सगळयात स्वस्त आणि उत्तम उपाय आहे.त्यासाठी तुम्ही बटाट्याच्या चकत्या बनवा. आणि चेहऱ्यावर १० मिनिटे चोळा. किंवा खिसलेल्या बटाट्याचे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटे सोडून द्या. दिवसातून असे २-३ वेळा केल्याने परिणाम लवकरच दिसून येईल.

३) बदाम आणि दूध :

आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर बदामाच्या तेलाने मालिश करा. आणि १५-२० मिनिटानंतर अतिरिक्त तेल चेहऱ्यावरुन पुसून घ्या. नियमितपणे असे केल्याने लवकरच आपल्याला याचा फायदा होईल. दुसऱ्या प्रकारच्या उपायात ७-८ बदाम १२ तास किंवा त्यापेक्षा जास्त पाण्यात भिजवून घ्या. आणि नंतर बदामाची सालं काढून त्याची ठेसून पेस्ट बनवा. आणि त्यात थोडे दूध घाला. हे पेस्ट चेहऱ्याच्या डागांवर लावा आणि संपूर्ण रात्र तसेच ठेवा. सकाळी थंड पाण्याने आपले तोंड धुवून घ्या. १५ दिवसात त्याचे परिणाम दिसून येतील.

४) पुदिना :

पुदिन्याच्या पानांमधे पाणी घालून त्यांना दळावे. हे पेस्ट चेहऱ्याच्या डागांवर लावा आणि १५-२० मिनीटे चेहऱ्यावर सोडा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून कमीत कमी १ वेळा तरी हे करा. त्याने तुमचा चेहरा सुंदर होईल.