आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मासिक पाळीत योग्य स्वच्छता राखली नाही तर इन्फेक्शन होण्याची भिती असते. यासाठी महिलांनी या दिवसांत स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. स्वच्छता राखल्यास बॅक्टेरियल इन्फेक्शपासूनही बचाव होतो. अन्यथा महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिलांना अनेक आजार होऊ शकतात. मासिक पाळीत कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ स्वच्छता न राखल्यामुळे त्वचेच्या काही समस्या उद्भवतात. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये.
२ अॅन्टीसेप्टिक क्रिमचा वापर करा. पण डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३ काही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ला घ्या.
४ कापड्याएवजी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करा.
५ दर ६ तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदला.
६ चांगल्या आणि स्वच्छ सॅनिटरी नॅपकिनचा वापर करा.
Visit : arogyanama.com