आरोग्यानामा ऑनलाईन टीम : नौकासन केल्याने कंबर, पाठ, मान, पाश्र्वभागातील स्नायू बळकट होतात. पाठीच्या कणा बळकट होतो व त्याचे आरोग्य वाढते. कंबरदुखी, पाठदुखी टाळण्यासाठी हे आसन नियमित केले पाहिजे. हे आसन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ शरीराचे वजन दोन्ही पायांवर सारखे ठेवा.
२ नियमित योगासनांचा सराव करत राहा.
३ वजन नियंत्रणात ठेवा.
४ पाठीला नियमित ताण देऊन पाठीचे स्नायू बळकट करा.
५ प्राणधारणादेखील तितकीच महत्त्वाची आहे.
६ हे योगासन सावकाश आणि काळजीपूर्वक करा.
७ सराव करण्यासाठी योग शिक्षकांकडून समजून घ्या.
८ शरीरावर ताण येणार नाही, याची काळजी घ्या.
९ स्लीप डिस्कसारख्या गंभीर आजारातचा हे आसन करू नका.
Visit : arogyanama.com