‘या’ ६ पद्धती वापरून लहान मुलांची ‘पोटदुखी’ करा दूर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुलं लहान असताना त्यांची काही न काही दुखणी सुरूच असतात. त्यामुळे आपल्याला सतत सतर्क राहावे लागते. लहान मुलांचं कधीही पोट दुखू लागते. आणि ते रडू लागतात. त्यावर आपल्याला नेमका काय उपाय करावा ते समजत नाही.

आपल्या स्वयंपाक घरात वापरले जाणारे हिंग हे पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा व स्वच्छ होतो. पोटाचे विकार तसेच श्वसनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना हिंग देणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या पोटावर हिंगाच्या पाण्याने मसाज करणे फायदेशीर ठरते.

१) त्यासाठी अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.

२) या पेस्टने बाळाच्या पोटाला मसाज करा.

३) ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.

४) पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

५) पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.

६) पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.