आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिलांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. काही महिलांना मासिक पाळीत खूप त्रास होतो. हा त्रास खूप असह्य असतो. यावर नेमका काय उपाय करावा हेच त्यांना माहित नसत. त्यामुळे आम्ही या त्रासावर उपाय म्हणून काही घरगुती टिप्स देत आहोत. या टिप्स फॉलो केल्या तर मासिक पाळीत होणारा त्रास कमी होईल.
१) तुम्हाला मासिक पाळीत जर खूप त्रास होत असेल तर तुम्ही कच्ची पपई खा. यामुळे तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील.
२) मासिक पाळीच्या काळात रात्रभर पांढरे तीळ पाण्यात भिजवून ठेवा. आणि ते पाणी दिवसातून दोन वेळा प्या.
३) तुम्ही मासिक पाळी सुरु असताना जर जीऱ्याचं पाणी पिल्यात तर मासिक पाळी नियंत्रणात राहते. सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो.
४) तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या. यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.
५) तुम्ही जर दररोज द्राक्षांचा रस पिलात तर तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल.
६) मासिक पाळीतील त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी धन्याच्या किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळेही तुमचा त्रास दूर होईल.