आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सतत गोडपदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते. मात्र, यामुळे लठ्ठपणा लवकर वाढू शकतो. तसेच अन्य आरोग्य समस्यासुद्धा होऊ शकतात. परंतु, काही लोकांना गोड खाणे इतके आवडते की ते थांबूच शकत नाहीत. एवढेच नव्हे तर काहींना मधुमेह असतानाही गोड खाण्याची प्रबळ इच्छा होते. पण अशा लोकांनी जास्त गोड पदार्थ आणि साखर कमी करण्याचा प्रयत्न मनापासून केलाच पाहिजे. ही सवय कमी करण्यासाठी काही सोपे उपाय असून त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
उपाय १
साखरेपासून दूर राहण्यासाठी आंबवलेले पदार्थ योग्य प्रमाणात खावेत. हे पदार्थ घरीच तयार करा. या उपायामुळे ८ दिवसात गोडाची सवय कमी होऊ शकते.
उपाय २
टेन्शनमुळेही गोड खाण्याची इच्छा आपोआप वाढते. म्हणून टेन्शनमुक्त व्हा. यासाठी कामाचे नियोजन करा. धावपळीतून स्वत:साठी वेळ काढा. ध्यानधारणा करा.
उपाय ३
इएफटी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स वापरून ही सवय कमी करता येते.
Visit : arogyanama.com