आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मधुर चवीमुळे आंबा सर्वांनाच आवडतो. चवीप्रमाणेच हे फळ विविध औषधी गुणांनी सुद्धा युक्त आहे. वेदांमध्ये आंब्याला विलासाचे प्रतिक मानले गेले आहे. केवळ आंबाच नाही तर याची साल, कोय, रस खूप उपयोगी आहे. आंब्याचा उपयोग करून रोगांवर उपचार करण्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.
असे करा उपाय
* आंब्याच्या ६० ग्रॅम रसामध्ये २० ग्रॅम दही आणि ५ ग्रॅम अद्रकाचा रस मिसळा. या मिश्रणाचे दोन-तीन वेळेस सेवन केल्यास अतिसाराची समस्या दूर होते.
* आंब्याच्या रसामध्ये मध मिसळून या मिश्रणाचे सेवन केल्यास प्लीहा वृद्धीची समस्या नष्ट होते.
* आंब्याचा रस २०० ग्रॅम, अद्रकाचा रस १० ग्रॅम आणि दुध २५० ग्रॅम एकत्र करून पिल्यास शारीरिक आणि मानसिक कमजोरी दूर होते.
* आंब्याच्या कोयीमधील बी आणि हिरडा समान मात्रेत घेऊन बारीक करून घ्यावे. हे चूर्ण दुधात मिसळून लेप करावा. हा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी थांबते.
* आंब्याच्या कोयीमधील बी वाळवून त्याचे चूर्ण तयार करून घ्यावे. हे चूर्ण पाण्यातून घेतल्यास स्त्रियांमधील प्रदर रोग दूर होतो.
डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या
मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या
‘उत्तम’ आरोग्यासाठी ‘या’ वाईट सवयी सोडा, अन्यथा आजारांचा धोका
लठ्ठपणा कमी करा ! ‘या’ खाद्यपदार्थांमध्ये फॅट ‘नष्ट’ करण्याची ताकद, जाणून घ्या
Comments are closed.