आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुगंधी आणि सुंदर दिसणारी अनेक प्रकारची फुले सजावटीसाठी आणि धार्मिक पुजापाठसाठी वापरली जातात. काही फुलांपासून अत्तरही बनविले जाते. मात्र, यापैकी अनेक फुले ही औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. या फुलांचा खाण्यात वापर केला जातो मात्र तो अप्रत्यक्षरित्या असतो. काही लोक फुले सलाडमध्ये सुद्धा वापरतात. अशा काही फुलांविषयी आपण महिती घेणार आहोत.
लॅव्हेंडरचे फुल
आइसस्क्रिम आणि दह्यात या सुगंधी फुलांचा वापर केला जातो. अँटीसेप्टिक आणि केसांचा रुक्षपणासाठी हे उपयोगी आहे.
शेवंती
शेवंतीचे फुले चहामध्ये टाकून हा औषधी चहा सेवन करतात. या फुलांमध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि मिनरल्ससह अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी-कार्सनोजोनिक गुण असतात.
जास्वंद
सलाडला गार्निश करण्यासाठी या फुलाचा उपयोग होतो. तसेच चहामध्येसुध्दा जास्वंदाच्या फुलांचा वापर केला जातो. यात अँटी-अॅक्सिडेंट असल्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
गुलाब
गुलाबाच्या फुलांचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. तर पानांचा वापर सलाड, आइसस्क्रिम, मिठाई, गुलाब-जल, जॅम, जेली, सरबतामध्ये केला जातो. हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहावर हे फुल गुणकारी आहे.