आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यास ते औषधीप्रमाणे लाभदायक ठरते. अनेकदा लहान मुलांना चॉकलेट खावू दिले जात नाही. कारण, आपल्या मनात चॉकलेटविषयी अनेक गैरसमज अगोदरपासूनच असतात. योग्य प्रमाणात मुलांना चॉकलेट दिल्यास ते खूपच लाभदायक आहे. जास्त चॉकलेट खाणे आता आरोग्यासाठी हितकारक असल्याचा शोध लागला आहे. चॉकलेटमधील काही खास औषधी गुणांची माहिती आपण करून घेणार आहोत.
हे आहेत औषधी गुण
* चॉकलेटमध्ये मूड ठीक करणारे आणि तणाव दूर करणारे गुण असतात. मूड खराब असेल तेव्हा थोडेसे चॉकलेट खावे.
* चॉकलेटमधील फ्लेवेनॉलमुळे रक्तसंचार व्यवस्थित राहतो. यामुळे चॉकलेट खाल्ल्यास मानसिक आजारामध्ये लाभ होतो.
* हृदयरोगासारख्या अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीत चॉकलेट उपयोगी आहे. चॉकलेटमध्ये कॉपर आणि पोटॅशिअम असते. यामुळे हृदयाशी संबधित आजार दूर राहतात. चॉकलेटमुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.
* चॉकलेट खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवेनॉल आणि अँटी ऑक्सीडेंट तत्व असतात. आठवड्यातून दोन-तीनदा थोड्या प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
* डार्क चॉकलेटमधील फ्लॅओनॉईडस आणि ग्लायकेमिक रसायन शरीरातील इन्सुलिनची पातळी योग्य प्रमणात ठेवते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्तातील साखरेच्या प्रमाणाची पातळी योग्य राहते.
* चॉकलेटमध्ये थेओब्रोमाईन नावाचा एक महत्त्वपूर्ण रासायनिक घटक आढळून येतो. थेओब्रोमाईन हे कफ आणि सर्दीसाठीही गुणकारी असते.
* चॉकलेट खाल्ल्याने शरीरात एण्डोफिजिन नावाचे हार्मोन उत्सर्जित होते. यामुळे चॉकलेट खाल्ल्यास वेदना कमी होतात. हे नैसर्गिक पेनकिलर आहे.