आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वातावरणात जास्त गारवा असल्यास नाक व तोंडावाटे शरीरीला जीवजंतूंचा संसर्ग होऊ शकतो. घशाचे इन्फेक्शन होऊ शकते. वातावरणातील बदलामुळे अथवा थंड पदार्थ खाल्यामुळे घसा दुखू शकतो. थंड पदार्थामुळे घशातील नाजूक भागाला इन्फेक्शन होते. इनफेक्शनमुळे घसा दुखत असेल तर नेहमीप्रमाणे काम करणे देखील कठीण होते. घसा दुखत असल्यास काही खास उपाय केल्यामुळे आराम मिळू शकतो.
हे उपाय करा
* घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे लवकर आराम मिळेल. किंवा आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करुन प्या.
* पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
* मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
* पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.
* लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.
* भरपूर आराम करा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.