आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्यांना अन्नपचन व्यवस्थित होत नाही, अशा व्यक्ती जेव्हा मसालेदार अथवा तळलेले पदार्थ खातात तेव्हा त्यांना गॅस, अॅसिडीटीची समस्या होते. पोटात गॅसची समस्या ही सामान्य समस्या असली तरी काही वेळा यामुळे छातीत दुखू लागते. कधीकधी डोकेदुखी, उलटी सुद्धा होऊ शकते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर ही समस्या मुळासह नष्ट करता येऊ शकते.
हे पदार्थ सेवन करा
१. जिरे
जिरे सेवन केल्यास स्वादुपिंडाच्या विविध तत्वांचा स्त्रास सुरू होतो. यात अनेक पोषकतत्व असतात. दूध, दही, सलाड अथवा सुपमध्ये जिरा सेवन करू शकता.
२. आवळा
आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे पोटदुखी, गॅस, अॅसिडीटी इत्यादीमध्ये आराम मिळतो.
३. हिंग
हिंगाचे सेवन केल्याने गॅसच्या समस्येत लवकर आराम मिळतो. एक ग्लास गरम पाण्यात हिंग मिसळून दोन ते तीन वेळा हे पाणी घ्यावे.
४. बेकिंग सोडा
पोटात गॅस होत असेल तर रोज रिकाम्यापोटी एक चमचा बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळून प्यावे.
५. दालचिनी
दालचिनी खाल्ल्याने सुद्धा गॅसची समस्या दूर होते. दालचिनी पाण्यात उकळून थंड करून रोज सकाळी रिकाम्यापोटी घ्या. यामध्ये मध मिसळून सुद्धा घेता येईल.
६. लसून
पोटात गॅस झाला असेल तर लसून जिरे, धने यासह पाण्यात उकळून दिवसातून दोन वेळा याचे सेवन करावे.