रोज दही व ताक खाल्ल्याने कमी होते चिंता

curd

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- ताक-दह्यासारख्या काही खाद्यपदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स नैसर्गिक रुपात आढळून येते. त्यांना गुड बॅक्टेरियाच्या रुपातही ओळखले जाते. कारण ते हानीकारक बॅक्टेरियासोबत दोन हात करतात आणि आतड्यांमध्ये त्यांना आपले बस्तान बसविण्यापासून रोखते. सोबतच अन्न पचविण्यामध्येही प्रोबायोटिक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

चीनच्या शांघाय शहरातील जियो टोंग युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी याआधी केलेल्या २१ अध्ययनांचे विश्लेषण करून त्याआधारे हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्यातील १४ अध्ययनांमध्ये गट मायक्रोब्जला नियंत्रित करण्यासाठी प्रोबायोटिक्सवर जोर देण्यात आला. दुसरीकडे ११ अध्ययनांमध्ये आतड्यांमध्ये आढळून येणाऱ्या बॅक्टेरियाला नियंत्रित केल्यामुळे चिंता, काळजीवर सकारात्मक प्रभाव दिसून आला.

दही व ताकामध्ये आढळून येणाऱ्या प्रोबायोटिक्समुळे फक्त आतड्यांतील बॅक्टेरियाच नियंत्रणात ठेवण्यासच मदत होत नाही, तर त्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही सुधारली जाऊ शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या पद्धतीने चिंता, घोर कमी करण्यास मदत मिळू शकते.