आरोग्यनामा ऑनलाइन : लठ्ठपणा हा थेट आहाराशी संबंधीत आजार आहे. काहीवेळा शरीराच्या इतर भागातील चरबीपेक्षा पोटावरील चरबी एवढी वाढते की, शरीर अतिशय बेढभ दिसू लागते. अशा पोटामुळे दैनंदिन जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. शिवाय, तुमच्या व्यक्तीमत्वावर वाईट परिणाम होतो तो वेगळाच. म्हणून पोटाची चरबी वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण ही चरबी साठू न देणे हाच चांगला पर्याय आहे. कारण एकदा का मोठ्याप्रमाणात पोटावर चरबी साठली की ती कमी करताना खूप वेळ लागतो.
पोट हा शरीराचा महत्त्वाचा भाग असून जेवणातील चांगल्या-वाईट बदलांनुसार पोट लवकर प्रतिक्रिया देते. पोट कमी करण्यासाठी खाण्या-पिण्यात योग्य बदल करणे गरजेचे आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकणारे काही सोपे उपाय आहेत. यासाठी भोजन तयार करताना त्यात अर्क म्हणजे फळांचा आसव टाकल्यास चव येते. तसेच शरीराचा मेदही नियंत्रित राहतो. जपानमध्ये अधिक वजनाने त्रस्त असलेल्या सुमारे १७५ महिला व पुरुषांवर एक संशोधन करण्यात आले. त्यातील ज्यांनी ज्यांनी एक किंवा दोन चमचे सफरचंदाच्या अर्काचे सेवन केले होते.
त्यांच्या शरीराच्या खालच्या भागातील चरबी १२ आठवड्यांमध्ये नियंत्रित झाल्याचे आढळले. अर्कात असलेल्या अॅसिटिक अॅसिडमुळे फॅट वाढवणा-या प्रथिनांच्या ब्रेक-डाऊन प्रोसेसला मदत होते. सरळ चालणे-फिरणे आणि बसण्याची सवय तुमचे शरीर सडसडीत करू शकते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. क्रोनिक बॅक पेनने त्रस्त असलेल्या १८ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. या वेळी त्यांना पायलेट्स व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला. हा व्यायाम केल्यानंतर त्यांच्या पॉश्चरमध्ये सुधारणा आढळल्या आणि पोट व पाठीच्या स्नायूंना बळकटी मिळाली.
पोट कमी करण्यासाठी केवळ योग्य आहार आणि नियमित व्यायाम करून उपयोग नसून पुरेशी झोप घेतल्याशिवाय आहार आणि व्यायामाचा लाभ होत नाही. कारण यामुळे स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल वाढू लागतो आणि पोटात चरबी जमा होऊ लागते. कॅनडा येथील संशोधकांनी सुमारे सहा वर्षे संशोधन केले. आठ तास झोप घेणा-या लोकांपेक्षा पाच ते सहा तास झोप घेणा-या लोकांचे वजन वाढण्याची ३५ टक्के शक्यता असते, असे या संशोधनातून आढळून आले आहे. तसेच सर्व प्रकारच्या धान्याचा आहारात समावेश केल्यास पोटाच्या आसपास फॅट गोळा होत नाही. यामुळे इन्सुलिन हार्मोनची निर्मिती कमी होते आणि पोटावर फॅट वाढत नाही. जेवणामध्ये सर्व प्रकारच्या धान्याचा समावेश न केल्यास पोट वाढण्याची शक्यता दुप्पट असते. पोटावर चरबी वाढू नये म्हणून सोडा, गॅस तयार करणा-या भाज्या, च्युइंग गम, जास्त मीठ आणि साखर असलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत.