आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराची योग्य हालचाल आणि व्यायाम केल्याशिवाय आरोग्य चांगले राहु शकत नाही. यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक असते. रोज काही निमिटे जरी व्यायाम केला तरी आरोग्य चांगले राहते. चालणे हा आरोग्यासाठी अतिशय चांगला व्यायाम आहे. यामुळे कॅलरी आणि चरबी कमी होते. मात्र, चालण्याचा व्यायाम कितीवेळ करावा, याविषयी अनेकांना माहिती नसते, यामुळे अनेकदा चालण्याचा योग्य परिणाम दिसून येत नाही. स्वीडनची युनिव्हर्सिटी ऑफ काल्मरमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोणत्या वयात किती पावले चालावे, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
वयानुसार रोज इतकी पावले चाला
* ६ ते १७ वर्षे – मुले – १५ हजार पावले
मुली १२ हजार पावले
* १८ ते ४० वर्षे – पुरूष – १२ हजार पावले
महिला १२ हजार पावले
* ४० ते ५० वर्षे – पुरूष – ११ हजार पावले
महिला – ११ हजार पावले
* ५० हुन अधिक वर्षे – पुरूष – ११ हजार पावले
* ५० ते ६० वर्षे – महिला – रोज १० हजार पावले
* ६० हून अधिक – महिला – रोज ८ हजार पावले