आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सतत मानसिक ताणतणावात राहिल्याने आपले शरीर काही संकेत देत असते. हे संकेत वेळीच ओळखून उपचार केल्यास अथवा तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केल्यास पुढील गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. टेन्शनची लक्षणे आपल्याला सतत संकेत देत असतात, हे संकेत कसे आळखावेत हे जाणून घेण्याविषयी आपण माहिती घेवूयात.
ही आहेत लक्षणे
* अचानक जबडा दुखण्याचा त्रास काही लोकांना होतो, हा त्रास टेन्शनमुळे होऊ शकतो. तसेच काही जणांची दातखीळ बसते अथवा दातांना हुडहुडी भरून ते वाजतात. हे थंडीमुळेच होते असे नाही, तर टेन्शनमुळे सुद्धा होऊ शकते.
* महिलांना मासिक पाळीत जास्त त्रास होणे, क्रॅम्प्स येणे या समस्या तुलनेत जास्त प्रमाणात जाणवतात. मानसिक ताणामुळे असे होऊ शकते.
* चित्रविचित्र स्वप्ने पडणे, रात्री अचानक जाग येणे, रात्री एकापेक्षा जास्त वेळा उठणे, हे टेन्शनमुळे होऊ शकते.
* सततचा तणाव असल्यास डोकेदुखीची समस्या हमखास होते. ही डोकेदुखीही विचित्र असते. सुटीच्या दिवशी, विकेण्डला हा त्रास होतो.
हे लक्षात ठेवा
१. ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील, तर वेळीच सावध व्हा.
२. वेग थोडा कमी करा. थोडे शांत व्हा.
३. थकलेले असतानाही कामाच्या मागे लागू नका. अन्यथा हा त्रास वाढू शकतो.
४. आवश्यक वाटते तेव्हा विश्रांती घ्या.