आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काकाडी विविध आजारांवर गुणकारी असल्याने तिचा आहारात मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. काकाडीपासून एक खास पेय तयार केले जाते. त्यास काकडी कूलर म्हटले जाते. हे पेय कसे तयार करावे, आणि याच्या सेवनाने कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
असे तयार करा पेय
* साहित्य :
सोलून बारीक तुकडे केलेले काकडीचे २ कप तुकडे, पुदिन्याची ७-८ पाने, पाणी २ कप, अर्धा टेबल स्पून लिंबाचा रस, २ टी स्पून साखर अथवा चवीप्रमाणे, मीठ, काळी मिरी पावडर चवीप्रमाणे, बर्फाचे तुकडे.
* कृती :
काकडी, पुदिना, पाणी, साखर अथवा मीठ काळी मिरी पावडर, एकत्र करून मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्या. हे मिश्रण गाळणीतून गाळून रस वेगळा काढा. या रसात लिंबाचा रस घाला. सव्र्ह करताना ग्लासात बफार्चे तुकडे टाका.