आरोग्यानामा ऑनलाइन – डोळ्यांचा पांढरा भाग लाल होणे किंवा काही रक्तवाहिन्यांना सूज येऊन त्या लाल होणे म्हणजे डोळे लाल होणे, असे समजले जाते. डोळ्यांच्या रक्तवाहिन्या रूंदावल्याने डोळे लाल होतात. डोळ्यांमध्ये एखादी गोष्ट जाणे, इन्फेक्शन होणे, यामुळे असे होऊ शकते. यामुळे डोळ्यांना वेदना होतात, खाज येते, सूज येते किंवा सतत पाणी येते. अशावेळी डॉक्टरंचा सल्ला घेतला पाहिजे. या समस्येची लक्षणे आणि उपाय आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
1 कोरड्या पापण्या
2 माती किंवा धुळ
3 अॅलर्जी
4 सर्दी-खोकला
5 जास्त उन्हाचा त्रास होणे
6 बॅक्टेरिया
7 सतत कंप्यूटरचा वापर
8 रक्त पातळ होण्याची औषधे घेणे
9 डोळ्यांच्या ड्रॉपचा जास्त वापर
10सर्दी-खोकला
11 धुम्रपान करणे
12 झोप पूर्ण न होणे
ही आहेत लक्षणे
1 पुसट दिसणे
2 दृष्टी कमी होणे
3 एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये वेदना होणे
4 टीव्ही पाहताना किंवा पुस्तक वाचताना त्रास होणे
5 डोळ्यांना खाज
6 डोळ्यांमधून पाणी येणे
7 उजेडाचा त्रास होणे
अशी घ्या काळजी
1 कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ वापरू नका. झोपताना लेन्स अवश्य काढा.
2 डोळे चोळू नका. यामुळे इन्फेक्शन, बॅक्टेरिया पसरतात.
3 डोळे चोळल्याने डोळ्यांच्या कॉर्नियाला इजा पोहचू शकते आणि सबकन्जंक्टिवायटल हॅमरेज होऊ शकते.
4 ऊन, वाफ, माती आणि क्लोरिनसारख्या उत्तेजक पदार्थांपासून दूर रहा.