आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुरुषांचे केस गळण्याची समस्या अलिकडे जास्त दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एस्टरोजेनेटिक एलोपिका आहे. जे पुरुषांमधील डीटीएच हार्मोन्सचे बॅलेंस बिघडल्यामुळे होते. यामध्ये पुरुषांच्या डोक्याच्या एका भागातील केस जलद गतीने गळतात. ३० टक्के लोकांमध्ये ही समस्या ३० व्या वर्षापर्यंत होते, असे एका संशोधनातून आढळले आहे.
पुरुषांचे केस गळण्यामागे एस्टरोजेनेटिक एलोपिकासह अन्य कारणेही आहेत. टक्कल पडण्याला जेनेटिक्स जबाबदार असू शकतात.
कुटुंबात पुरुषांचे केस कमी वयात गळाले असतील, तर इतरांचे असेच होऊ शकते. डायटमध्ये योग्य प्रमाणात न्यूटरिशन न घेतल्याने बॉडीवर आयरन, व्हिटॅमीन ए, प्रोटीन, झिंक, कॅल्शियम यांसारख्या न्यूटरिशनची कमतरता निर्माण होते. यामुळे केस गळतात. तंबाखूमधील निकोटिनमुळे ब्लड नव्र्स संकुचित होतात. ज्यामुळे बॉडीचे ऑक्सीजन लेव्हल कमी होते, ज्यामुळे केसांना नुकसान पोहोचते.
जास्त दारु प्यायल्यामुळे बॉडीमध्ये टॉक्सिन्स वाढतात. यामुळे आयरन, झिंक, पाण्याची कमतरता होते. अशावेळी केस गळतात. मानसिक ताण वाढल्यावर बॉडी हार्मोन्स बॅलेंस बिघडते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या होऊ शकते. डोक्यात फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याची समस्या झाल्यास केस जलद गळतात. अनेक वेळा संधिवात, हार्ट डिसिज, ब्लड प्रेशर, थायरॉइडसारख्या औषधांच्या साइड इफेक्टमुळे केस गळण्याची समस्या होते. हेयर जेल, कलर्स, शाम्पू, कंडीशनरमधील केमिकल्सच्या साइड इफेक्टमुळे केस गळतात. पुरुषांमध्ये केस गळण्याची कॉमन कारण म्हणजे एन्टोजेनेटिक एलोपिका आहे. शरीरात डीटीएच हार्मोन बॅलेंस बिघडल्यामुळे ही समस्या होते.