आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हिमोफेलिया हा रक्ताचा आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार होत नाही, त्यामुळे जखम झाल्यानंतर तिथून सातत्यानं रक्तस्त्राव होतो. जखमेतून वाहणार रक्त गोठत नाही. मेंदू, किडनी अशा महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तस्राव झाल्यास त्यामुळे गंभीर आणि गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही वेळा अपंगत्वही येऊ शकतं.
हिमोफेलिया होण्याची कारणे –
रक्तामध्ये प्रोटीनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग फॅक्टरवर परिणाम होतो. त्यामुळे रक्ताची गुठळी बनत नाही.
अनुवंशिकता
हिमोफेलिया ए (रक्तघटक ८) आणि हिमोफिलिया बी (रक्तघटक ९) या घटकांच्या कमतरतेमुळे .
हिमोफेलियाचे प्रकार –
हिमोफेलिया ए, बी आणि सी हे तीन प्रकार आहेत.
शरीरात रक्त गोठवण्यासाठी १३ घटक असतात. त्यापैकी ८ क्रमांकाचा रक्तघटक नसल्यास हिमोफेलिया ए आणि ९ क्रमांकाच्या घटकाच्या कमतरतेमुळे हिमोफेलिया बी आजार होतो. हिमोफेलिया बी पेक्षा हेमोफिलिया ए पेक्षा सर्वाधिक लोकांमध्ये आढळून येतो.