वाहते नाक यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये थांबेल. जिरे फंगस आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करते. यामुळे शरिराची इम्यून सिस्टम ताकदवान होते. जिऱ्यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे सर्दी-ताप होत नाही.
* ताप आला असल्यास दोन कप पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळावे. पाणी उकळल्यावर त्यात बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पान टाकावे. पाणी गार झाल्यावर ते गाळून प्यावे.
* सर्दी झाल्यास पाण्यात जिरे टाकून त्याची वाफ घ्यावी. पाण्यात थोडी लवंग सुद्धा टाकावी. यामुळे नाक मोकळे होते. वाफ घेतल्यानंतर डोके चादरीने झाकावे. वाफ घेतल्यानंतर लगेच हवेचा संपर्क झाल्यास छातीमध्ये कफ होऊ शकतो. हे घरगुती उपाय असून याने फरक पडत नसल्यास डॉक्टराचा सल्ला घ्यावा.