आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पिकलेली पपई सर्वांना आवडते आणि पपई ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आपण तिचा आपल्या आहारात समावेश करतो. पण तुम्हाला माहित आहे का ? कच्ची पपई पण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील अनेक आजार नियत्रंणात येतात. त्यामुळे तुम्ही पिकलेल्या पपई सोबतच कच्च्या पपईचा ही तुमच्या आहारात समावेश करा.
१) कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात ‘अ’, ‘ई’ आणि ‘क’ जीवनसत्व असते. ही जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसं यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मुत्रविकारांसंबंधी समस्यांचेही कच्ची पपई निराकरण करते.
२) शरीरावर अनेक नको असलेले केस उगवतात. हे अनावश्यक केस खराब दिसतात. दरवेळी वॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय होतो. कच्च्या पपईत असणारे ‘पैपिन’ नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.
३) कच्या पपईमध्ये ‘व्हिटमिन ए’ मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून वाचण्यासाठी पपईचा आहारत समावेश करावा.
४) आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी कच्ची पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते.
५) आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील ‘व्हिटामिन सी’च्या गरजेपेक्षा अधिक व्हिटामिन सी केवळ कच्या पपईमुळे मिळू शकते.
६) कच्ची पपई खाल्ल्यामुळे तुमचे वजन कमी करण्यासही मदत होते. त्यामुळे कच्ची पपई खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.