आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रांचीतील प्रभात तारा मैदानात आयोजित योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. योग दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पुढाकार घेतला आहे. कारण त्यांना स्वताला योगाची आवड आहे. नरेंद्र मोदी हे अथक परिश्रम करत असतात. मात्र, ते कधीही थकलेले दिसत नाही की आजारी पडलेले दिसले नाहीत.
याचे कारण म्हणजे ते नियमित योगा करतात. सूर्य नमस्कार आणि प्राणायाम ही त्यांची आवडती योगासने आहेत.योगा केल्यानंतर ते अर्धा तास फिरतात. शिवाय ते चार ते पाच तासांपेक्षा जास्त झोप घेत नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहाटे चार-पाच वाजताच्या दरम्यान उठतात. यानंतर ते योगा करतात. तज्ज्ञांच्या मते योगामुळेच मोदी यांचे शरीर निरोगी आहे.
मोदी हे साधे शाकाहारी जेवण घेतात. कोमट पाण्याने ते आंघोळ करतात. त्यांच्या जेवणात सलाड, फळे जास्त प्रमाणात असतात. पंतप्रधान मोदींसाठी रांचीतील धुर्वा येथील प्रभात तारा मैदान विशेष आहे. त्यांनी २०१४ मध्ये त्यांनी झारखंडच्या याच मैदानातून निवडणूक प्रचार रॅली काढली होती. आता चौथ्यांदा मोदी या मैदानात योग दिनानिमित्त येत आहेत.