हे व्यायाम प्रकार करा
* पावसाळ्यात लवकर उठून धावायला जावे. फक्त धावल्याने सुद्धा तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.
* रोज-रोज धावणे कंटाळवाणे वाटत असल्यास सायकलिंग सुद्धा करता येईल.
असा घ्या आहार
* पाणी उकळून प्यावे. पचनक्रिया पावसाळ्यामध्ये जड होते. म्हणून पचनास हलका आहार घ्या. जास्त आहार घेणे टाळावे. खाल्लेले अन्न पचावे यासाठी आहारात मिरे, हिंग, सुंठ, आले, लसून, जिरे, यांचा समावेश करावा.
* लाह्या पचण्यास हलक्या असल्याने या दिवसांमध्ये धान्याच्या लाह्या खाव्यात. मूग डाळ पचनास हलकी असल्याने मूगाच्या डाळीचे प्रमाण वाढवावे.
* आहारात पालेभाज्यांचे प्रमाण कमी करावे. खायच्या असल्यास पालेभाज्या, फळे स्वच्छ करुन खावी. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.
* तूपाचा आहारात समावेश करा. तुपामुळे पित्त, वात कमी होतो. तळलेल्या पदार्थामुळे शरीरातील पित्त वाढते. म्हणून तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
* हातगाडीवरील, अस्वच्छ ठिकाणावरील आणि उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.