स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
२० मिनिटांनंतर
हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण सामान्य होते. यामुळे कार्य सुरळीत राहते.
२ तासानंतर
शरीर निकोटीनची मागणी करू लागते. यामुळे झोप येणे, आळस, तणाव, भूक लागणे, अशा समस्या जाणवतात.
१२ तासानंतर
शरीरातील कार्बन मोनॉक्साईडची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामन्य होण्यास सुरूवात होते. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होऊ लागतात.
२४ तासानंतर
शरीरात निकोटीनचे प्रमाण खुप कमी होते, यामुळे हार्टअटॅकचा धोका कमी होतो.
४८ तासानंतर
शरीरातील ब्रोन्कियल ट्यूबला आराम मिळतो. यामुळे उर्जापातळीत वाढ होते.
३ दिवसानंतर
शरीरातून निकोटीन पूर्णपणे बाहेर पडते. याकाळात डोकेदुखी, घाम येणे, अस्वस्थता, ताण येणे, अशी समस्या होते.
२ आठवड्यानंतर
शरीरातील रक्ताभिसरण पूर्णपणे सामान्य होते. शरीरातून निकोटीन पूर्णपणे बाहेर गेल्याने फुफ्फूसांचे कार्य व्यवस्थित सुरू होते.
१ वर्षानंतर
हृदयरोगाचा धोका ५० टक्के कमी होतो.
५ वर्षानंतर
हृदय आणि फुफ्फूस निरोगी व्यक्तीप्रमाणे होतात. हृदयरोग आणि कँसरची शक्यता कमी होते.
१० वर्षानंतर
सर्व प्रकारच्या कँसरची शक्यता रहात नाही. आयुष्यमान १० वर्षांनी वाढते.
Comments are closed.