सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्त, जाणून घ्या
लोहाची पुरेशी मात्रा
भोपळ्याच्या बियांमध्ये लोहाची पुरेशी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अॅनिमियाच्या रुग्णाने दररोज भोपळ्याच्या बिया सेवन कराव्यात. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास या बिया खाणे सुरू करावे. यातील फायबरमुळे पोट साफ होते. तसेच शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि त्वचा, केसासंबंधी समस्या दूर होतात. या बियांमध्ये अॅमिनो अॅसिड, झिंक, मँगनीज आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असते. यामुळे मेंदूची शक्ती वाढते. तसेच मिरगी, मायग्रेनचा त्रास कमी होतो. शिवाय, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या बिया फायदेशीर आहेत.
सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे सौंदर्य वाढवण्यासाठी, वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठी या बियांचे सेवन करावे. यामध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने मांसपेशीचा अशक्तपणा दूर होतो. तसेच कॉपर आणि सेलेनियमची मात्रा भरपूर असल्याने या बियांमुळे त्वचेसंबंधी समस्या जसे पांढरे डाग कमी होतात. यातील पोषक तत्त्वांमुळे हृदय निरोगी राहते. रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा नियंत्रणात राहते. या बियांचे नियमित सेवन केल्यास चांगले कोलेस्टेरॉल वाढतात आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी होतात.