पुणे : शलाका धर्माधिकारी – किशोरवयात तारुण्य पिटिका येणं हा निसर्गाचा नियम आहे. परंतु त्यानंतर येणारे पिंपल्स हे मुख्यत्त्वेकरून आहारातील बदल आणि त्यामुळे शरीरात अंतर्गत होणाऱ्या बदलांमुळे येतात. आणि हे पिंपल्स येताना बऱ्याच दिवसाचे पाहुणे म्हणून येतात. तसेच त्यांच्या पाऊलखुणाही खूप दिवस राहतात. त्यामुळे मुली खूप परेशान होतात. पण घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आपल्या घरातील मसाले हे एका रात्रीतून हे पिंपल्स नष्ट करण्याच काम करतील. त्यासाठी खालील. टिप्स वापरा. पिंपल्सला एका रात्रीतून पळवून दालचिनी हा जालीम उपाय आहे. जो फक्त पिंपल्सच नाही. तर पुढे पडणारे डाग आणि खड्डे पडू देत नाहीत . हा फेसपॅक बनवण्यासाठी दालचिनीचा तुकडा बारीक कुटून घ्यावा. त्याची पावडर डब्यात भरून ठेवावी.
चेहेऱ्यावर असलेल्या पिंपल्सच्या संख्येनुसार हि पावडर घ्या. हा फेसपॅक संपूर्ण चेहेऱ्यावर लावू नका. फक्त पिंपल्सवर लावा. या पावडरमध्ये लिंबाचा रस टाकून हे मिश्रण लावायचे आहे.
लिंबू आणि दालचिनीने पिंपल्सच्या भागावर काही काळ टोचल्यासारखे होईल. ब्लिच लावल्यानंतर जशी काही काळ चेहऱ्याची आग होते तशीच काहीशी आग होईल. पण नंतर ही कमी होईल. हे १५ मी. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. आणि पुन्हा तेवढ्याच भागावर बर्फ फिरवा. किंवा कापूस गार पाण्यात भिजवून पिंपल्सवर ठेवा . असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स रात्रीतून गायब होईल.