आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Protein Deficiency Signs | आपल्या शरीराच्या विकासासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते, त्यापैकी एक प्रोटीन (Protein) आहे. प्रोटीन ही प्रत्येक वयाची विशेष गरज असते. लहानपणापासून ते तारुण्य आणि वृद्धापकाळापर्यंत शरीराला प्रोटीनची गरज असते. अवयवांच्या निर्मितीमध्ये प्रोटीनचा मोठा वाटा असतो (Protein Deficiency Signs).
त्वचा, रक्त, स्नायू आणि हाडांच्या पेशींच्या (Skin, Blood, Muscle and Bone Cells) विकासासाठीही हे विशेष पोषक घटक आवश्यक असतात. शरीरासाठी आवश्यक असलेल्या या पोषकतत्वाच्या कमतरतेमुळे (Protein Deficiency Signs) शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.
एका सर्वेक्षणानुसार, जगभरात सुमारे 1 अब्ज लोक प्रोटीनच्या कमतरतेचे बळी आहेत. आहारात प्रोटीन घेतल्यास शरीराला ऊर्जा (Energy) मिळते. प्रोटीन पेशी तयार करतात तसेच तुटलेले तंतू दुरुस्त करतात. एवढेच नाही तर प्रोटीनचे सेवन केल्याने इम्युनिटी (Immunity) सुद्धा मजबूत होते.
जर तुम्हालाही तुमच्या शरीरात अशक्तपणा (Weakness) जाणवत असेल, तर सर्वप्रथम, शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे ओळखा आणि अशा गोष्टींचा आहारात समावेश करा ज्यामुळे प्रोटीनची कमतरता पूर्ण होऊ शकते.
प्रोटीन्सच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Protein Deficiency) :
1. स्नायू आणि सांधे दुखणे (Muscle and Joint Pain)
2. थकवा (Fatigue)
3. कमजोर इम्युनिटी (Weak Immunity)
4. शरीर अचानक फुगलेले दिसणे (Body Looks Bloated)
5. मुलांची उंची कमी होणे
6. त्वचेवर आणि नखांवर चट्टे (Scars On Skin and Nails)
7. केस कमकुवत होऊन गळणे (Weak Hair)
प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश (Include These Foods In Your Diet)
– शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी दलिया (Oatmeal) सारख्या धान्याचा आहारात समावेश करा.
– प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचे (Modified Cereals) सेवन करा.
– डाळीमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळींचा (Pulses) समावेश करा.
– प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी कॉटेज चीजचा (Cottage Cheese) आहारात समावेश करावा. कमी कॅलरीचे पनीर (Paneer) प्रोटीनची कमतरता पूर्ण करेल तसेच शरीर निरोगी ठेवेल.
– (Protein) प्रोटीनची कमतरता सोयाबीनने (Soybean) पूर्ण करा. सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करतात.
– प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात शेंगांचा (Legumes) समावेश करा.
– सुकामेवा आणि बिया (Dry Fruits and Seeds) शरीराला ऊर्जा देतात, तसेच प्रोटीनची कमतरता देखील पूर्ण करतात.
– अंडी (Eggs) आणि दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products) हे प्रोटीनचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत, त्यांचा आहारात समावेश करा.
– चिकन (Chicken) आणि मासे (Fish) खाल्ल्याने प्रोटीनची कमतरता दूर होऊ शकते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Protein Deficiency Signs | 7 signs and symptoms of protein deficiency know the best foods to increase protein level
शरीराला कसा प्रभावित करतो Diabetes, किडनी, हृदय आणि मेंदूवर करतो असा परिणाम…
Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांनी झोपण्यापूर्वी करावी ‘ही’ 5 कामे, शुगर राहील कंट्रोल