आरोग्यनामा ऑनलाईन टीम- सध्या वाढत चाललेल्या आजारांपैकी थायरॉइड हा एक गंभीर आजार आहे. हा आजार बरा होण्यासाठी खूप पथ्ये पाळावी लागतात. या आजारावर नियंत्रण मिळायचे असेल तर आपण घरगुती पद्धतीने थायरॉईडवर नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी धन्याचे पाणी रोज सेवन केल्याने थायरॉईडची समस्या काही दिवसात दूर होते असे मानले जाते. डायबिटीससोबतच धन्यांमध्ये असेही तत्व आढळतात. ज्याने कॉलेस्ट्रॉल सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. धन्याच्या पाण्याने जळजळ दूर होते आणि पिंपल्सची समस्याही दूर होते.
असा करा थायरॉईडवर उपाय :
२ चमचे धन्याच्या बिया रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे धने पाण्यासहीत ५ मिनिटांसाठी उकडा आणि हे पाणी कोमट झाल्यावर सेवन प्या. जर तुम्ही थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी औषधं घेत असाल तर आधी रिकाम्यापोटी औषध घ्या. आणि नंतर ३० मिनिटांनी हे पाणी प्यावे. त्यानंतर ३० ते ४५ मिनिटांना तुम्ही नाश्ता करू शकता. तुम्ही हे पाणी दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी सेवन करू शकता. हे पाणी थायरॉइड कंट्रोल करण्यात फायदेशीर ठरतं. ३० ते ४५ दिवस या पाण्याचे सेवन केल्यावर तुम्ही तुमच्या थायरॉइडची लेव्हल चेक करा.
थायरॉइडवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा :
१) दूध आणि दह्याचा आहारात समावेश करा.
२) सकाळी- सकाळी सूर्याच्या किरणांमध्ये बसा.
३) व्हिटॅमिन डी हायपोथायराइडिज्म आणि याचसारख्या आजारांपासून बचाव करतो.
४) कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि प्रोटीन असलेला आहार थायरॉइड ग्रस्त लोकांसाठी महत्त्वाचा आहे.
५) व्हिटॅमिन ‘ए’ सुद्धा फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही गाजर, अंडी आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करा.
६) थायरॉइडची समस्या असल्यावर जास्तीत जास्त फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.