आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फळं आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि आवश्यकच असतात. विविध फळांमध्ये विविध प्रकारची उपयुक्त अशी पोषकतत्वे भरलेली आहेत. पण काहीवेळा कापलेली फळे उरतात आणि ती काळी पडतात. जाणून घ्या कापलेली फळे टिकवण्यासाठी उपाय –
1) प्लास्टिक किंवा अॅल्युमिनिअम फॉइलनं झाकून ठेवा –
कापलेली फळं स्वच्छ बाउलमध्य ठेवा. बाउल प्लास्टिक किंवा अॅल्युमिनिअम फॉइलनं झाकून ठेवा. हवा खेळती राहण्यासाठी त्याला काही छिद्रं ठेवायला विसरू नका.
2) सायट्रिक अॅसिड –
कापलेल्या फळांवर सायट्रिक अॅसिडचा वापर करावा. त्यामुळे फळं दहा ते बारा तास चांगली राहतात. तसेच फळांची मूळ चवही टिकून राहते.
3) लिंबाचा रस –
कापलेल्या फळांना लिंबाचा रस लावल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवा.
4) बर्फ-
कापलेली फळे एका डब्यात घालून तो डबा बर्फ घातलेल्या पाण्यात ठेवावा.