आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतातून आयात करण्यात आलेल्या ब्रँडेड मिठाची अमेरिकेत तपासणी करण्यात आली असता या मीठामध्ये कार्सिनोजेनिक आणि सायनाइडसारखे अन्य घातक घटक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रत्येक घरात जेवण बनवताना मीठाचा वापर केला जातो. मोठाप्रमाणात मीठ वापरताना आपण ते आयोडिनयुक्त असल्याची खात्री करून घेतो. आपल्याकडील जाहीरातीमधून आणि शासनाकडून तसे सांगितले गेल्याने आपण ती काळजी घेतो. परंतु,याशिवाय आपण खात असलेल्या मीठामध्ये आणखी काय आहे ? हे आपल्याला माहित नसते. अमेरिकेत झालेल्या तपासणीत जो प्रकार निदर्शनास आला आहे, त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
भारतातील नामांकित कंपनीच्या आयोडाइज्ड मिठाची तपासणी अमेरिकन वेस्ट अॅनालिटिकल लॅबोरेटरीजने केली असता या मिठात कार्सिनोजेनिक आणि सायनाइडसारखे अन्य घातक घटक असल्याचा निष्कर्ष या प्रयोगशाळेने काढला आहे. या मिठात १.८५ एमजी/केजी या घातक प्रमाणात सायनाइड असल्याचे आढळून आले. भारतातील जेमस्टोन उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे गोधम ग्रेन्स अँड फार्म प्रॉडक्टचे अध्यक्ष शिव शंकर गुप्ता यांनी भारतातील विविध मीठ ब्रँडची तपासणी केली. ९१ वर्षांचे गुप्ता यांनी घातक घटक असणाऱ्या मिठापासून मुक्तता करण्याची मोहीम उघडली आहे. लोकांना आरोग्यदायी मीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
भारतातील काही आघाडीच्या कंपन्या आयोडिन आणि सायनाइड अशा घातक रसायनांचा समावेश असणाऱ्या औद्योगिक कचऱ्याचे पुन्हा पॅकेजिंग करून खाद्य मीठ म्हणून त्याची विक्री करत आहेत. हे ब्रँड मीठ रिफाइन करण्यासाठी ब्लिचिंग करणे, आयोडिन आणि सायनाइड अशा घातक रसायनांचा वापर करतात. सायनाइड हे विष भारतातील आघाडीच्या मीठ उत्पादक कंपन्या बिनधास्त वापरत आहेत. पोटॅशिअम फेरो सायनाइड हेविष काणत्याही उत्पादनामध्ये वापरण्याची परवानगी भारत वगळता जगात कुठेही नाही. नैसर्गिक मिठात आयोडिन असते. त्यामध्ये कृत्रिमदृष्ट्या आयोडिन टाकले जाते. त्यामुळे मीठ विषारी ठरत आहे. यामुळे कॅन्सर, हायपरथायरॉईडझम, उच्च रक्तदाब, नपुंसकता, स्थूलता आणि किडनी निकामी होणे अशा भयंकर आजारांचे प्रमाणा वाढत चालले आहे, अशी माहिती गोधम ग्रेन्स अँड फार्म प्रॉडक्टचे अध्यक्ष शिव शंकर गुप्ता यांनी दिली.