गरोदरपणात महिलांना असते ५० टक्के फॉलिक अॅसिडची गरज
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फॉलिक अॅसिड हे पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये कंजेनाइटल डिफेक्टला थांबवण्यास मदत करते. यामुळे गरोदरपणात फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. कडधान्यात फॉलिक अॅसिड, बायोटिन आणि पोषक खनिजे असतात. यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. तसेच मोड आलेल्या कडधान्यामध्ये असलेली एन्जाइम प्रथिनांचा अमिनो अॅसिड, फॅटला फॅट अॅसिड आणि कार्बोहायड्रेटचे साखरेत आणि स्टार्चमध्ये रुपांतर करते. यामुळे पचन व्यवस्थित होते.
आहारामध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश केल्यास गरोदरपणादरम्यान होणारी गुंतागुंत कमी होते. गव्हापासून तयार होणारा ब्रेड, ब्राउन ब्रेड, राइस, कॉर्न, ओट आणि असा आहार घ्यावा ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त आहे. दिवसातून एक वेळा तरी अख्खे धान्य खावेच. या वस्तूंमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. या वस्तू टॉक्सिन्स दूर करण्यातही मदत करतात.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयरन, अँटीऑक्सीडेंटस आणि फॉलिक अॅसिड असते. हे बाळाच्या संपूर्ण विकासासह गभर्वती महिलेमधील रक्ताची कमी होण्यापासून बचाव करते. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या जसे पालक, मेथी फॉलिक अॅसिडचे चांगले स्त्रोत आहे. संत्री, एवेकोडा आणि आंब्यामध्ये व्हिटॉमिन ए आणि सी आहे. हे फळ फॉलिक अॅसिडचे चांगले स्रोत आहे. या प्रकारचे द्राक्षांमध्ये व्हिटॉमिन ए, फोलेट, पोटॅशियम आणि सोडियम असते. याला फळांच्या स्वरुपातच खावे. नाहीतर फळांचा रस घ्यावा. अथवा सॅलेड खावे.