आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एरियल योग हा योगा, जम्नास्टिक्स, डान्स आणि एक्रोबेट्सचा संमिश्र प्रकार आहे. हा जमीनीच्या काही फूट अंतरावर सिल्कचा कपडा बांधून करण्यात येतो. हे अवघड असले तरी याचे अनेक फायदे आहेत. गर्भावस्था, नेत्ररोग, हृदयरोग, चक्कर येण्यासारखी समस्या असेल तर योग करु नये. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनखालीच हा योगा करावा. याविषयी सविस्तर माहिती आपण घेवूयात.
असा करतात हा योग
१) सिल्क फेब्रिकने शरीर जमीनीपासून काही अंतरावर बांधले जाते.
२) हवेत योग करताना प्रत्येक पोश्चरवर लक्ष द्यावे लागते.
३) श्वास, हात आणि पायांच्या मूव्हमेंटवर लक्ष ठेवले जाते.
४) यात कोणतीच स्टेप चूकवता येत नाही.
५) योग करणारा झोपाळ्यासारखा झुलत असतो.
६) जास्त दबाव हा टेलबोनवर पडतो.
हे आहेत फायदे
१) कार्डियोवस्कुलरमुळे शरीर निरोगी होते.
२) पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.
३) एकाग्रता वाढवण्यात मदत होते.
४) मसल्स, स्पाइनल आणि खांदे लवचीक बनतात.
५) तणाव मुक्त झाल्याने मेंदू आणि शरीर रिलॅक्स होते.
६) शरीराला परिपुर्ण ऑक्सीजन मिळतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो.