आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोट हे अनेक आजारांचे मूळ असते. पोट खराब राहिले तर विविध आजार होऊ शकतात. अनियमित दिनचर्या आणि अयोग्य आहार यामुळे अपचनाची समस्या होते. पोटदुखी, गॅस, अपचन, अॅसिडिटी या सामान्य समस्या असल्या तरी याचे मुख्य कारण अन्न व्यवस्थित न पचणे हे आहे. यासाठी पोटाचे आरोग्य जपणे खुप महत्वाचे असते. गॅस, अॅसिडिटी, आदी कारणामुळे पोटदुखी होत असल्यास कोणते उपाय करावेत याबाबत माहिती घेवूयात.
हे उपाय करा
१ एक चमचा गरम पाण्यात एक छोटा चमचा मीठ टाकून हे पाणी प्या. पोट दुखायचे थांबते.
२ थोडे मेथीदाणे भाजून त्याची पावडर तयार करा. ही पावडर कोमट पाण्यातून घेतल्यास पोटदुखी थांबते.
३ काळेमिरे, हिंग, सुंठ समान मात्रेत घेवून त्याचे चूर्ण तयार करा. सकाळ, संध्याकाळ कोमट पाण्यातून हे चूर्ण घेतल्यास पोटाला आराम मिळतो.
४ डाळिंबाच्या दाण्यावर काळेमिठ आणि मिरे पावडर टाकून खावे. गॅसमुळे होणारी पोटदुखी यामुळे थांबते.
५ एक ग्लासभर लेमन ज्यूस तयार करून त्यामध्ये काळे मीठ टाका. हे सकाळ, संध्याकाळ घ्या.
६ दोन विलायची बारीक करून मधातून घ्या, आराम मिळतो.