वजन कमी करायचेय तर, बटाट्याचे सेवन कमी करा

बटाटा

आरोग्यनामा ऑनलाइन – सर्वच घरांच्या स्वयंपाकघरात बटाटे वर्षभर दिसून येतात. स्वयंपाकात सुद्धा त्याचा वापर मुबलक प्रमाणात करण्यात येतो. झटपट जेवण बनवायचे असल्याचे गृहिणी बटाट्याच्या रेसिपींनाच पसंती देतात. सुकी भाजी, रस्सा भाजी, पराठा, भजी, सँडविच अशा विविध पदार्थांमध्ये बटाटा वापरण्यात येतो. परंतु, बटाट्याच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे बटाटा आठवड्यातून चार पेक्षा जास्त वेळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

बटाट्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी, खनिज तत्व आणि कार्बोहायडेट असतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असल्याने आरोग्य चांगले राहते. जुन्या बटाट्यांच्या तुलनेत ताज्या बटाट्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे स्कर्वी रोगापासून बचाव होते. शंभर ग्रॅम बटाट्यामध्ये २० मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. परंतु, बटाट्यात फॅट्सचे प्रमाणही अधिक असल्याने बटाट्याचे सेवन कमी प्रमाणात करणे कधीही चांगले. आहार तज्ज्ञही हाच सल्ला देतात.

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर बटाट्याचंसेवन कमी करणे चांगले आहे. जास्त बटाटा खाल्याने डायबिटीससोबतच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. डायबिटीस म्हणजेच मधुमेहाच्या रूग्णांसाठी बटाटा अत्यंत नुकसानदायी आहे. अशा लोकांनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बटाट्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते. बटाट्याच्या सेवनाने गॅसची समस्याही वाढते. तसेच अनेकांना गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्यांचा त्रास होतो.

गॅसची समस्या सतत जाणवत असल्यास बटाटा खाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. आठवड्यातून चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा बटाटा खाल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. यामुळे बटाट्याचे सेवन कमी केले पाहिजे. बटाट्याच्या अधिक सेवनाने वजन वाढतं. परंतु, ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी बटाटा फायदेशीर आहे.