आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Post-Covid Hair Fall | जे रूग्ण कोविडमधून रिकव्हर झाले आहेत, त्यांच्यात केस गळतीची समस्या वाढत चालली आहे. एक्सपर्टनुसार, शारीरीक आणि मानसिक तणावामुळे असे होते. कोविडमधून बरे झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात ही (Post-Covid Hair Fall) समस्या दिसत आहेत.
करा हे उपाय
1. फिश ऑईल
अँटीऑक्सीडेंट्ससह ओमेगा-3 सप्लीमेंटसुद्धा घ्या. यामुळे केस दाट होतात, गळायचे थांबतात, इम्यूनिटी वाढते, आरोग्य चांगले राहते.
2. कांद्याचा रस
कांद्यात सल्फरची मात्रा जास्त असल्याने केसांच्या वाढीला मदत होते. कांद्याचा रस केंसाच्या मुळाला लावा. एक तासानंतर केस धुवून टाका.
3. अंडी
आयोडीन, सल्फर, फॉस्फरस आणि प्रोटीन असलेले अंडे आहारात घेतल्याने केस गळती थांबते. हेयर पॅकप्रमाणे केसांना लावू शकता.
4. आवळा
लिंबाच्या रसात थोडा आवळा रस मिसळा आणि तो केसांना लावा. यात मीठ आणि मध टाकून खाऊ सुद्धा शकता.
5. खोबरेल तेल लावा
यातील आयर्न आणि पोटॅशियममुळे केसांची वाढ होते, केस गळती थांबते. खोबरेल तेल गरम करून केसांना मसाज करा. हे आठवड्यातून दोनवेळा करा.
Web Title :- Post-Covid Hair Fall | post covid hair fall 5 best home remedies for hair fall
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे