आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोनाची हलकी लक्षणे असलेले रूग्ण 14 दिवसात बरे होतात. मात्र, निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा थकवा आणि कमजोरी कायम राहते. काही लोकांना तर यातून पूर्णपणे ठिक होण्यास 6-8 महिन्यांचा काळ लागतो. लवकर रिकव्हरी आणि जुन्या रुटीनमध्ये परत येण्यासाठी हेल्थ एक्सपर्टच्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. डॉक्टर दिक्षा भावसर यांनी इंस्टाग्रामवर या टिप्स दिल्या आहेत.
हे लक्षात ठेवा
1. सकाळी लवकर उठा –
सकाळी लवकर उठल्याने सकारात्मक उर्जा जाणवते. ताजी हवा शरीराला अॅक्टिव्ह करते. सकाळी व्यायाम करण्यासाठी उत्साह असतो.
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या
2. सोप्या एक्सरसाईजने सुरूवात –
जड एक्सरसाईज करू नका. हळुहळु वॉकपासून सुरूवात करा, ब्रिदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन करा. या काळात शरीराला आराम हवा असतो.
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !
3. प्राणायाम करा –
नियमित अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम करा, यामुळे शरीरात ऑक्सीजनची कमतरता होत नाही.
पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
4. सकाळचे उन घ्या –
रोज सकाळी 30 मिनिटे उन्हात बसा. यामुळे व्हिटॅमिन डी आणि एनर्जी मिळेल.
मलेरिया तापामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध
5. ड्राय फ्रुट्स खा –
रात्रभर पाण्यात भिजवलेले एक खजूर, मुठभर मनुके, दोन बदाम आणि अक्रोड रोज सकाळी खा. शरीर आतून मजबूत होईल.
Coronavirus : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय? जाणून घ्या कधी येते हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ
6. लंचकडे लक्ष द्या –
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवस हलके आणि सहज पचणारे पदार्थ खा. रोज डाळीचे पाणी प्या, एक दिवसाआड पौष्टिक खिचडी खा.
7. शेवगा सूप –
शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात. डिप्रेशन, जीव घाबरणे आणि थकवा दूर होतो. यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा शेवग्याच्या शेंगाचे सूप प्या.
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
8. जीरे, धने, बडीसोपचा चहा –
दिवसात दोन वेळा जीरे, धने आणि बडीसोपचा चहा प्या. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते, वजन नियंत्रणात राहते, तणाव कमी होतो, इम्युनिटी आणि पचन चांगले होते. जेवणानंतर एक तासाने प्या.
शरीरात ऑक्सीजनची लेव्हल वाढवणे आणि कायम राखण्यासाठी ‘हे’ 4 आहेत परिणामकारक उपाय
9. रात्री लवकर झोपा –
जास्त वेळ आणि चांगली झोप घेतल्याने लवकर बरे व्हाल. यासाठी रात्री लवकर झोपा.
10. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग –
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियमित पालन करा.