आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Pomegranate Peel Benefits | हे सर्वज्ञात सत्य आहे की, भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की त्यांची सालंही आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. टिक टॉक कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व अरमन अदमजान यांनी अलीकडेच डाळिंबाच्या सालीचे फायदे (Pomegranate Peel Benefits) आणि त्याच्या सालीची शक्तिशाली पावडर बणवण्याबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, डाळिंबाची साल घसा खवखवणे, खोकला, पोटाच्या समस्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आदमजान म्हणाले की, फळांपेक्षा सालीमध्ये जास्त अँटीऑक्सिडंट असतात.
डाळिंबाच्या सालीची पावडर कशी बनवायची?
एका पातेल्यात साल (आतील पडद्यासह) ठेवा. नंतर ती ओव्हनमध्ये ३५० अंशांवर २० मिनिटे बेक करा. साल सुकल्यानंतर बारीक पावडर करा. पावडरचे ब्राऊन मिश्रण वापरण्यासाठी तयार आहे.
हे कसे वापरावे
आदमजान यांनी सांगितले की, डाळिंबाचा चहा बनवता येतो. रिकामी टी बॅग घ्या आणि त्यात एक चमचा डाळिंबाच्या सालीची पावडर घाला. ती एक ग्लास गरम पाण्यात भिजवा. डाळिंबाचा चहा तयार आहे. ते म्हणाले की, डाळिंबाची साल घसा खवखवणे, खोकला, पोटाच्या समस्या आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
त्वचेसाठी फायदेशीर
डाळिंबाच्या सालीची पावडर त्वचेसाठी उत्तम असते. पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि पेस्ट बनवा.
नंतर चेहऱ्यावर लावा. आता आपला चेहरा २० मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा.
असे केल्याने पिंपल्स आणि मुरमांपासून सुटका मिळेल आणि सुरकुत्याही कमी होतील. तज्ञांच्या मते, डाळिंबाची साल कोलेजन वाढवते जे नैसर्गिकरित्या आणि प्रभावीपणे त्वचेचे वय वाढणे रोखते. (Pomegranate Peel Benefits)
डाळिंबाच्या सालीचे इतर फायदे
– डाळिंबाच्या सालीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.अतिसार आणि इतर पचन समस्यांवरदेखील हा एक चांगला घरगुती उपाय आहे.
– (Pomegranate) डाळिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते,
जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि खराब झालेल्या त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.
– डाळिंबाच्या सालींमुळे तोंडातील फोड, हिरड्यांना आलेली सूज, श्वासाची दुर्गंधी आणि दातांच्या इतर आरोग्य समस्यांपासून बचाव होतो.
Web Title :- Pomegranate Peel Benefits | pomegranate peel benefits sore throat to bone health these benefits of pomegranate peel you hardly know
Heart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे
यावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल
Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे