आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डाळिंबाच्या (Pomegranate) लाल रंगात पॉलीफेनल्स आढळतात जे एक पॉवरफुल अँटीऑक्सीडेंट्स म्हणून काम करतात. यातील अँटी-इफ्लेमेटरी प्रॉपर्टीज आर्थरायटीज म्हणजे हाडांशी संबंधीत आजारात लाभदायक आहे. तसेच, डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate) धमण्यांमध्ये सुधारणा करून ब्लड फ्लो चांगला करतो. याचा रोजच्या आहारात समावेश केल्याने ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, इम्युनिटी, डायजेशन आणि मेमरीसंबंधी समस्या दूर होतात.
डाळिंब खाण्याचे हे आहेत 24 आरोग्यदायी फायदे (24 health benefits of eating pomegranate)
1. डाळिंब (Pomegranate) खाल्ल्याने जास्त तहान आणि जळजळपासून आराम मिळतो.
2. स्पर्म काऊंट आणि सीमेन क्वालिटी सुधारते.
3. सहज पचणारे डाळिंब खाल्ल्याने डायरियात आराम मिळतो.
4. इंटस्टायनल डिसॉर्डरची समस्या दूर होते.
5. अल्सरेटिव्ह कोलायटिसची समस्या दूर होते.
6. डाळिंब (Pomegranate) खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो.
7. इम्यूनिटी वाढते.
8. बॉडीची स्ट्रेंथ वाढते.
9. हायपरटेंशन आणि कॉलेस्ट्रोल नियंत्रित करते.
10. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
11. यात रेड वाईन आणि ग्रीन टी पेक्षा तीनपट जास्त अँटीऑक्सीडेंट आहे.
12. हे बेस्ट अँटी-इन्फ्लेमेटरी फूड आहे.
13. फ्री रेडिकल्स दूर करते.
14. पेशींना डॅमेज होण्यापासून वाचवते.
15. इन्फ्लेमेशनच्या समस्येत आराम मिळतो.
16. फायबर, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि पोटेशियमचा चांगला स्त्रोत आहे.
17. एक डाळिंब (Pomegranate) शरीरात फोलेटची दिवसाची एक चतुर्थांश गरज पूर्ण करते.
18. डाळिंब इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यात उपयोगी आहे.
19. ब्लड शुगर नियंत्रित ठेवते.
20. गोड डाळिंब वात, पित्त आणि कफ संतुलित करते.
21. आंबट डाळिंब वात आणि कफ संतुलित करते. पण पित्त वाढवते.
22. डाळिंब त्वचेसाठी खुप लाभदायक आहे.
23. केसांसाठी सुद्धा डाळिंब परिणामकारक आहे.
24. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
Web Title :- Pomegranate | eat pomegranate every morning to prevent diabetes arthritis heart disease dalimbache fayade in marathi
Dengue Fever | डेंग्यूचा ताप कधी होतो घातक? ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Diet tips | अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर अतिशय कमी प्रमाणात खा ‘हे’ 10 पदार्थ; जाणून घ्या