आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रदूषणाचा फुप्फुसांवर परिणाम होतो. मात्र काही प्रदूषकांचा किडनीच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. पीएफएस ही औद्योगिक कंपन्यांमधून निघणारी व विघटन न होणारी प्रदुषके मातीमध्ये, अन्नामध्ये, पाण्यात, हवेत सर्वत्र आहेत. माणसांचा त्याच्याशी सतत थेट संबंध येतो, अशी माहिती क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पीएफएएस प्रदूषकांचा परिणाम
1 मूत्रपिंडे ही अत्यंत संवेदनशील असतात. जेव्हा हवेतील प्रदुषके रक्तप्रवाहामध्ये येतात तेव्हा मूत्रपिंडांना धोका अधिक संभवतो.
2 पीएफएसच्या संपर्कात आल्यामुळे किडनीजवळील नलिका व चयापचयातील मार्गांमध्ये अडथळे निर्माण होऊन मूत्रपिंडाचे आजार निर्माण होतात.
3 प्रौढांपैक्षा लहान मुले या प्रदुषकांच्या संपर्कात जास्त येतात अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
4 फुप्फुसांवरही यांचा गंभीर परिणाम होऊन विविध आजार होऊ शकतात.