आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या या आधुनिक काळातही ‘मुलगी सुंदरच हवी’ हा सर्वच तरुणांचा हट्ट असतो. त्यामुळं सुंदर मुलींनी ‘योग्य’ वर हेरल्यानंतर उरलेल्या सर्वसाधारन मुलींचे विवाह ही सर्वच कुटुंबियांना भेडसावणारी काळजी ठरते. अविवाहित मुली ह्या समाजाच्या अवहेलनेचे एक साधन बनतात. केवळ रूपामुळं अडून राहिलेल्या मुलींचे विवाह जर चिंतेचा प्रश्न ठरू शकत असेल, तर त्यावरची आजपर्यंत सर्वांना अनभिज्ञ असलेली वैद्यकशास्त्राजवळची रोखठोक उपाययोजना म्हणजे ‘प्लॅस्टिक सर्जरी’ एखाददुसऱ्या वैगुण्यामुळं सौंदर्याला मुकलेल्या मुलींच्या पुढच्या समस्यांना एकमेव आणि सर्जनशील उत्तर केवळ प्लॅस्टिक सर्जरीतच सापडू शकेल.
१) नाक हे चेहऱ्याच्या मधोमध केंद्र स्थानी आहे व त्यामुळे नाकाची थोडीशीदेखील विकृती लगेच लक्षात येते. कानाची विकृती एकवेळ पदराने किंवा केसाने लपविता येते. पण नाकाच्या बाबतीत प्लॅस्टिक सर्जरीने किमयाच केली आहे. बसकं, नटकं, नाक उंच करणं, मोठे किंवा बाकदार नाक छोटं करणे हे सर्व काही कुशल प्लॅस्टिक सर्जन करू शकतो. नाकावरील सर्व ऑपरेशन्स बाहेरील बाजूस कोणताही वण निर्माण न करता पार पाडता येतात. त्यामुळे प्लस्टिक सर्जरी आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवते असं म्हणायला हरकत नाही.
२) वाढत्या वयोमानाप्रमाणे चेहऱ्याची कातडी सैल होऊ लागते व सुरकुत्या दिसू लागतात. ह्या सुरकुत्याही काढून टाकता येतात आणि आपले वय १५-२० वर्षांनी कमी करता येते. हे फक्त प्लास्टिक सर्जरीने करता येते.
३) तरुणपणी येणाऱ्या पुटकुळ्या चेहऱ्याच्या कातडीवर बारीक बारीक खड्डे ठेऊन जातात. अशा खडबडीत कातडीला पुनाश्च नितळ बनविणे हे प्लॅस्टिक सर्जनच करू शकतात.
४) सुंदर दिसण्यासाठी वक्षस्थळ व पोटाचा आकार यांचा विचार करावा लागतो. चांगला बांधा दिसण्यासाठी वक्षस्थळे उंचीच्या मानाने प्रमाणबद्ध असावी लागतात. बऱ्याचवेळा ती वाजवीपेक्षा लहान किंवा मोठी किंवा ओघळलेली असतात. लहान वक्षस्थळे मोठी करणे व मोठी ओघळलेली योग्य आकारात लहान करणे हे प्लास्टिक सर्जरीनं जमतं. त्यामुळे प्लास्टिक सर्जरी करणे चांगले आहे.