ही आहेत कारणे
१ प्रसूतीच्या वेळी गुदमार्ग ताणला जाऊन व्रण होणे.
२ मूळव्याध शस्त्रकर्म करताना चुकीने व्रण होणे.
३ जास्त अतिसार तसेच उष्ण औषधीमुळे जखमा होणे.
४ मलप्रवृत्ती कडक होणे व त्यासाठी लावला जाणारा जोर यामुळे गुद्द्वाराच्या जागी चिरा पडतात आणि हा रोग होतो. हे याचे प्रमुख कारण आहे.
५ पोटात मुरडा येऊन चिकट फेसाळ मलप्रवृत्ती होणे हे प्रवाहिकेचे लक्षण आहे. रुग्णाला किमान ४-५ वेळा शौचास जावे लागते. यामुळे मोठ्या आतड्यासह गुद्द्वाराची जागा अलवार होते, सुजते. परिणामी गुद्द्वाराच्या ठिकाणी जखमा तयार होतात.
६ बहुतांश मूळव्याधीच्या रुग्णांना फिशरचा त्रास असतो. मूळव्याधीची गाठ व मलबद्धता यामुळे फिशर होतात.
हे उपाय करा
१ कडुलिंबाचे पान तुपात भाजून त्यामध्ये थोडा कापूर मिसळा. हे पाईल्सच्या कोंबावर लावा.
३ रूईच्या दुधामध्ये हळद पावडर मिसळून हे कोंबावर लावा. हा रामबाण उपाय आहे
४ मिरपूड आणि काळे जिरे पावडर रोज मधासोबत घ्या
५ दुधी भोपळ्याची पाने बारीक वाटून पाईल्सच्या कोंबावर लावा
६ तुळशीची पाने थोड्या पाण्यासोबत वाटून कोंबावर लावा
७ कारल्याच्या बियांची पावडर मध आणि व्हिनेगरसोबत मिसळून कोंबावर लावा
८ कच्चा कांदा मंद आचेवर भाजून याची पेस्ट लावा
९ चहाच्या पानांची बारीक पेस्ट करून गरम करून लावा
१० मुठभर काळे तीळ एक वाटी दह्यासोबत नियमित खा
११ मेंदीच्या पानांची पेस्ट लावा