आरोग्यनामा ऑनलाईन टीम- फार्म. डी चे पदवीधारकांना आता त्यांच्या नावापुढे डॉक्टर असा उल्लेख करता येणार आहे. फार्म. डी या अभ्यासक्रमात विदयार्थ्यांना प्रिस्क्रिप्शन, औषधांतील घटक, औषधाचा रूग्णावर होणारा परिणाम, याची माहिती देण्यात येते. तर फार्म. बीच्या शिक्षणात औषध कसे तयार होते, उत्पादन याची माहिती दिली जाते. त्यामुळे फार्म. डीचे पदवीधारक आता आपल्या नावापुढे डॉक्टर असे लिहू शकणार आहेत. फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाने यासाठी परवानगी दिली आहे.
यासंदर्भात फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाने पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की, जे विद्यार्थी डॉक्टर ऑफ फार्मसीची पदवी घेतील ते विद्यार्थी आपल्या नावापुढे डॉक्टर असा उल्लेख करू शकतील. फार्म. डीची पदवी घेणाऱ्या पदवीधारकांना नावामागे डॉक्टर लावण्याची परवानगी मिळावी यामागणीसाठी अनेकदा फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाला पत्र लिहिण्यात आले होते. आता या पदवीधारकांची मागणी मान्य झाली असून फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाने तशी परवानगी दिली आहे.
फार्म. डी हा कोर्स फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाने २००८मध्ये सुरु केला होता. अमेरिकेत फार्म. डी धारक नावापुढे डॉक्टर असा उल्लेख करतात. आता भारतात सुद्धा फार्म. डीचे पदवीधारक नावापुढे डॉक्टर असा उल्लेख करू शकतात. फार्म. डी सहा वर्षांच्या कोर्स असून पाच वर्षांचा कोर्स आणि एका वर्षाची इंटर्नशिप आहे. त्यामुळे एबीबीएसच्या समकक्षच हा अभ्यासक्रम आहे.