आरोग्यनामा ऑनलाईन – इम्यून सिस्टम/ इम्यूनिटी कमजोर असलेल्या व्यक्तीला टीबी होण्याची शक्यता जास्त असते. टीबीचा बॅक्टेरिया शरीराच्या ज्या भागात असेल, तेथील ऊतींना नष्ट करतो आणि त्या अवयवाची कार्यक्षमता प्रभावित करतो. फुफ्फुसावर याचा मोठा परिणाम होतो. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. छोट्या जागेत राहणार्या लोकांमध्ये हा संसर्ग वेगाने पसरतो.
मुलांना जास्त धोका
* जर मुलांना टीबी झाला तर तो जास्त घातक ठरतो, यासाठी जन्मताच बाळाला बीसीजीची लस दिली जाते.
* मुलांना टीबी झाला तर त्यांच्या संपूर्ण शरीरात टीबी पसरू शकतो.
* मेंदूवर सुद्धा परिणाम झाल्यास या स्थितीला मॅनेंजायटिस म्हणतात.
टीबीच्या रूग्णांनी याकडे लक्ष द्यावे
– खोकताना तोंडावर हात, कपडा ठेवावा.
– दिवसभरातील कफ बंद भांड्यात जमवून सायंकाळी तो मातीत गाडून टाकावा.
– रूग्णाच्या खाण्यापिण्याची आणि त्यास शुद्ध वातावरणात ठेवण्याची व्यवस्था करावी.
– उपचारासह टीबीच्या रूग्णाला एक्सरसाइज आणि आरोग्यदायी जेवण द्यावे.
– दिवसात किमान 2 वेळा 45 मिनिटापर्यंत वेगाने चालणे आणि धावण्याचा व्यायाम करावा. यामुळे लंग्ज कॅपेसिटी वाढते आणि रोगाशी लढण्यास मदत होते.
– खाण्यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, वसा युक्त जेवण आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन जास्त करावे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला देखील झोपेत झटके येतात? जाणून घ्या कारण
डायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या
रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या