आरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्यांच्यावरून अनेक रहस्य उलगडू शकतात. व्यक्तिच्या झोपण्याच्या सवयीवरून ती व्यक्ति किती हुशार आहे, हे समजू शकते, असे एका संशोधनात आढळून आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या झोपण्याच्या सवयी आणि हुशारी कशी ओळखावी ते जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१. रात्रीची कमी झोप
रात्री जास्त झोप न येणे चांगले आहे. २००९मध्ये झालेल्या संशोधनात आढळून आले आहे. ज्या व्यक्ति सर्केडियन रिदमला नियंत्रणात ठेवतात. त्या अत्यंत हुशार असतात. सर्केडियन रिदम एक सायकल असते, ज्यामुळे शरिराला कधी जेवायचे आहे किंवा कधी उठायचे आहे, याच्या आज्ञा मिळतात.
२. आलार्म बंद करणे
रात्री उशिरापर्यंत झोप न येणारे सकाळी अलार्म वाजल्यानंतर सारखा-सारखा बंद करतात. ही सवय चांगली असल्याचे संशोधक सांगतात. कारण ही सवय ती व्यक्ती हुशार असल्याचे संकेत आहेत.
३. पैसे कमावण्याची क्षमता
संशोधकांनी लोकांच्या इकॉनॉमिक्स स्टेटससोबत त्यांच्या झोपण्याची तुलना केली. ज्या व्यक्ती रात्री ११ वाजल्यानंतर झोपतात आणि सकाळी ८ वाजता उठतात. त्यांच्यात जास्त पैसे कमावण्याची क्षमता असते. हे संशोधन युनिवर्सिटी ऑफ साउथ मटोनने केले आहे.
४. हा चांगला संकेत
अनेक व्यक्ती वेळेवर उठण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जास्त लोकांचा हा प्रयत्न असफल ठरतो. तसे पाहता हा चांगला संकेत आहे. यामुळे कळते की, शरिराचा आवश्यक गरजांशी ताळमेळ आहे.
५. सर्केडियन रिदम
ज्या व्यक्ती सर्केडियन रिदमला कंट्रोल करू शकतात. त्या जास्त क्रिएटिव्ह आणि महत्त्वकांक्षी असतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अनेक कठीण प्रसंगांशी दोन हात करण्याची क्षमता असते.