आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे, की जे लोक नियमितपणे चष्मा घालतात त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. भारतात झालेल्या एका नव्या अभ्यासात असे सांगितले गेले आहे की जे लोक चष्मा घालतात त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता ३ पट कमी असते. यामागचे कारण असे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या हातांने डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करते तेव्हा हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. तोंड आणि नाकावर मास्क असतो आणि डोळ्यावर चष्मा असतो तेव्हा चष्मा घातलेले लोक त्यांच्या डोळ्यांना कमी स्पर्श करतात आणि म्हणूनच कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका कमी असतो.
लिंबाची सालही तितकीच फायदेशीर; जाणून घेतल्यास नाही फेकून देणार तुम्ही
अभ्यासामधील १९ टक्के लोकांनी नियमित चष्मा घातला होता
मेडआरक्झिव ही जगातील प्रसिद्ध आरोग्य विज्ञान वेबसाइट आहे ज्यावर हा अभ्यास भारतात प्रकाशित करण्यात आला आहे. उत्तर भारतातील कानपूर येथील रुग्णालयात हा अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये ३०४ लोकांचा समावेश संशोधकांनी केला. त्यापैकी २२३ पुरुष आणि ८१ महिला होत्या. हे सर्व लोक १० ते ८० वर्षे वयोगटातील होते आणि या सर्व लोकांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळली. अभ्यासात सामील झालेल्या १९ टक्के लोक असे होते ज्यांनी बहुतेक वेळा चष्मा घातला होता.
त्वचेसाठी व्हिटॅमिन B5 किती आवश्यक ! कमतरता कशी पुर्ण करणार?
प्रत्येक व्यक्ती प्रत्येक तासाला २३ वेळा चेहरा आणि ३ वेळा डोळ्याला स्पर्श करतो
अभ्यासामध्ये सामील झालेल्या संशोधकांना असे आढळले आहे की सरासरी, सहभागींनी त्यांच्या चेहऱ्यावर तासाला २३ वेळा हात लावतात आणि डोळ्यांना सरासरी तासाला तीन वेळा हात लावतात. यावेळी असे आढळले की जे नियमितपणे चष्मा घालतात त्यांच्यामध्ये संसर्ग होण्याचा धोका २ ते ३ पट कमी होता. दूषित हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे आणि चोळणे हा संसर्ग पसरवण्याचा महत्त्वाचा मार्ग असू शकतो असा अभ्यास अभ्यासात नोंदला आहे.
केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !
२०२० मध्ये झालेल्या एका अभ्यासातही हे उघड झाले होते
याबद्दल काही डॉक्टर असेही म्हणतात की कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणार्या लोकांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी चष्मा वापरावा. मागील वर्षात २०२० मध्ये जॅमिया नेत्र रोगशास्त्र जर्नलमध्ये एक अभ्यास देखील प्रकाशित करण्यात आला होता ज्यामध्ये असे सांगितले गेले होते की चष्मा घालणाऱ्यांना कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याची आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
फक्त एक महिना दररोज ‘या’ भाजीचं करा सेवन, हैराण करतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
त्वचा उजळण्यासाठी घरी सहजपणे बनवा चारकोल फेशियल, जाणून घ्या
घरीच ‘या’ 5 स्टेपव्दारे सोप्या मार्गानं करा Chocolate Pedicure आणि मिळवा सुंदर पाय