आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्वयंपाकासाठी लसुण अत्यंत आवश्यक असतो. यासाठी प्रथम लसूण सोलावा लागतो. लसूण सोलणे ही प्रक्रिया महिलांना अतिशय किचकट आणि त्रासदायक वाटते. परंतु, काही खास पद्धतींचा अवलंब केल्यास ५ मिनिटात लसुण सोलता येऊ शकतो. लसूण सोलण्याच्या अशा पाच पद्धती आपण जाणून घेणार आहोत.
या आहेत पाच पद्धती
१) लसुण १०-१५ मिनीटे एक डब्ब्यात ठेवा. नंतर हा डब्बा १० मिनिट हलवा. लसुण आपोआप सोलून निघेल.
२) फक्त ३० सेकेंदांसाठी लसुणला मायक्रोवेवमध्ये ठेवा. बाहेर काढल्यानंतर लसुण आपोआप सोललेला असेल.
३) मायक्रोवेव नसेल तर साल काढण्यासाठी कढईचा वापर करु शकता.
४) लसुण चाकु खाली पकडा आणि हाताने दाबा.
५) एका भांड्यात पाणी घेवून त्यामध्ये लसुण टाका. एका तासानंतर पाण्यातुन काढा. हे जमीनीवर दाबुन सोला. सहज साल निघेल.