आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्याच्या काळात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी खास काळजी घ्यावी. आज, या लेखाच्या माध्यमातून अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ती हिवाळ्याच्या काळात खूप फायदेशीर असते. आम्ही शेंगदाण्याबद्दल बोलत आहोत. हिवाळ्यात शेंगदाण्याचे सेवन खूप फायदेशीर असते. शेंगदाण्याला स्वस्त बदाम देखील म्हणतात. बदामांमध्ये शेंगदाण्यातील सर्व पोषक घटक आढळतात. हिवाळ्याच्या मौसमात आजारांपासून दूर राहण्यासाठी शेंगदाणे खावे. शेंगदाणे खाण्याचे फायदे-
प्रथिने
शेंगदाण्यात प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. शेंगदाणे सेवन केल्यास शरीरातील प्रथिनेची कमतरता दूर होते. शारीरिक वाढीसाठी शरीरात प्रथिने असणे आवश्यक असते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
शेंगदाणे खाल्याने वजनही नियंत्रणात राहते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शेंगदाण्याचे सेवन करा. हिवाळ्याच्या मोसमात शेंगदाण्याचे सेवन खूप फायदेशीर असते
हृदयरोग्यांसाठी फायदेशीर
कर्करोगाचा धोका कमी
अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार आठवड्यातून दोनदा शेंगदाणे खाणारे महिला आणि पुरुष यांना कर्करोगाचा धोका स्त्रियांमध्ये ५८ टक्के आणि पुरुषांमध्ये २७ टक्के कमी असतो
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
शेंगदाणे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांना शेंगदाणा सेवन फार फायदेशीर आहे. बर्याच संशोधनांनुसार, शेंगदाण्याच्या सेवनाने मधुमेहाचा धोका २१ टक्के कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
शेंगदाणे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होते. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जी रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.